अनाधिकृत बियाणे विक्रेत्यांवर कारवाईचे जिल्हाधिका-यांचे निर्देश


v फवारणी करतांना विषबाधा होऊ देऊ नका

यवतमाळ, दि. 09 :   जिल्ह्यात अनाधिकृत बियाणे विक्रेत्यांवर धाड टाकून कठोर कारवाई करा.  यासाठी कृषी विभागास जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल. कारवाईसाठी मागेपुढे पाहू नका, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी कृषी विभागाला दिले. तसेच शेतक-यांनी फवारणी करतांना आवश्यक दक्षता घ्यावी. याबाबत कृषी विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करावे, अशाही सुचना त्यांनी केल्या. आयोजित आढावा बैठकीत सांगितले.

जिल्ह्यात खत व बियाणे उपलब्धतेबाबत सर्व तालुका कृषि अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषि अधिकारी व कृषी विभागाच्या सर्व अधिका-यांची जिल्हाधिका-यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी पंकज बरडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण 16 तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बियाण्यांची मागणी तथा आज रोजीपर्यंत उपलब्ध झालेले बियाणे, जिल्ह्यात रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला.

कृषी विभागाच्यावतीने स्थापन केलेल्या भरारी पथकामार्फत आतापर्यंत तीन ठिकाणी धाड टाकून अनधिकृत बियाणे जप्त करण्यात आले असून संबंधितांविरुध्द पोलिस स्टेशमध्ये गुन्हयाची नोंद करण्यात आल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिका-यांनी बाभुळगाव तालुक्यातील गोंधळी, पांढरकवडा तालुक्यातील निलजइ व कळंब तालुक्यातील झाडकिन्ही येथे करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी येत्या खरीप हंगामामध्ये विषबाधेवर नियंत्रण मिळविण्याकरीता सर्वोतोपरी प्रयत्न करावे. जिल्ह्यामध्ये एकाही शेतकरी / शेतमजुर यांना किटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होणार नाही, याकरीता विशेष लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी