जिल्ह्यात 41 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


v शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ नाही

यवतमाळ, दि. 05 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 41 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला शुक्रवारी 42 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 41 रिपोर्ट निगेटिव्ह तर एका रिपोर्टचे अचून निदान न झाल्यामुळे त्याची तपासणी पुन्हा करण्यात येईल. तसेच शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 41 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत.

आज (दि.5) प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 32 नमुन्यांपैकी 31 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. याशिवाय संभाजी नगर येथील चार रिपोर्ट निगे‍टिव्ह तर महागाव, वडगाव, नेर, कळंब ग्रामीण, वणी आणि मारेगाव येथील प्रत्येकी एक असे एकूण 41 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका रिपोटचे निदान अचूक झाले नाही.

आयसोलेशन वॉर्डात शुक्रवारी पाच नवीन रुग्ण भरती करण्यात आले. त्यामुळे येथे भरती असलेल्या रुग्णांची संख्या 54 आहे. यात 41 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश असून 13 केसेस प्रिझमटिव्ह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 154 झाला आहे. यापैकी 111 जण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 2245 नमुने तपासणीला पाठविले. सर्वांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2091 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.  

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी