जिल्ह्यात एक नव्याने पॉझेटिव्ह, एकाला डिस्चार्ज


Ø 24 तासात 52 रिपोर्ट निगेटिव्ह

यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात सोमवारी एक जण नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. तर सुरवातीला पॉझेटिव्ह असलेला व आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला एक रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज (दि.29) नव्याने पॉझेटिव्ह आलेली महिला दिग्रस येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्हची संख्या 51 वरून 52 झाली होती. मात्र आयसोलेशन वॉर्डातून एकाला सुट्टी झाल्यामुळे ही संख्या पुन्हा 51 झाली आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 53 रिपोर्ट प्राप्त झाले. यात एक जण पॉझेटिव्ह तर 52 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 65 जण भरती आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 268 झाली आहे. यापैकी 208 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची संख्या नऊ आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 4794 नमुने तपासणीकरीता पाठवले असून यापैकी 4560 प्राप्त तर 234 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4292 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

0000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी