ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णाच्या संख्येत एकाने वाढ


v आयसोलेशन वॉर्डात 24 जण भरती

यवतमाळ, दि. 01 : जिल्ह्यातील पॉझेटिव्ह रुग्णाच्या संख्येत एकाने वाढ झाली असून ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची 20 झाली आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 24 जण भरती आहेत. यात चार प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.

शासकीय रुग्णालयाने सोमवारी 83 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2150 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यापैकी 2070 रिपोर्ट प्राप्त तर 80 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 128 झाली आहे. यापैकी 106 पॉझेटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आतापर्यंत 1942 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 12 तर गृह विलगीकरणात 441 जण आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात आता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सदर कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. या वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्यक्तिंच्या विरोधात कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच घराच्या बाहेर पडतांना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. असे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच घरातील 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 10 वर्षांखालील मुलांची  विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

०००००००


Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल