जिल्ह्यात आज सकाळपासून आणखी चार पॉझेटिव्ह रुग्णाची भर



v आयसोलेशन वॉर्डात 40 पॉझेटिव्हसह एकूण 50 जण भरती

यवतमाळ, दि. 03 : आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या तीन व्यक्तिंचा तर पुसद येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या एका व्यक्तिचा (वय 45) रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चारने वाढ झाली असून सध्यास्थितीत जिल्ह्यात 40 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 50 जण भरती असून यापैकी 11 केसेस प्रिझमटिव्ह आहे.

पॉझेटिव्ह आलेल्या चार व्यक्तिपैकी एक जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवक आहे. दोन जण हे सुरवातीच्या पॉझेटिव्ह असलेल्या व्यक्तिच्या कुटुंबातील सदस्य आहेत. पुसद येथील व्यक्ती हा मुंबईवरून 25 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यात आपल्या गावी आला होता. खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे वैद्यकीय मदतीकरीता त्याने गावच्या सरपंचासोबत संपर्क केला. त्यानंतर पुसद येथील प्रशासनाने रुग्णवाहिका पाठवून सदर व्यक्तिला भरती करून घेतले. या व्यक्तिच्या कुटुंबातील चार सदस्य अजून मुंबईला आहे.

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 30 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी चार पॉझेटिव्ह तर 26 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 148 झाला आहे. यापैकी 40 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह सध्यास्थितीत भरती असून 106 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 2034 जणांचे रिपोर्ट आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 13 तर गृह विलगीकरणात 443 जण भरती आहे.

राज्याच्या रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून गृह विलगीकरणातच राहावे. स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्थानिक लोकांच्या संपर्कात येऊ नये. असे प्रकार आढळल्यास गावक-यांनी संबंधित तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, ठाणेदार किंवा इतर प्रशासकीय यंत्रणेस त्वरीत कळवावे. जेणेकरून गृह विलगीकरण नियमाचे उल्लंघन करणा-या व्यक्तिविरुध्द भादंविच्या कलम 188 नुसार गुन्हा नोंद करता येईल. तसेच बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांना कोव्हिडसदृश्य लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, सारी, आयएलआय व इतर लक्षणे असल्यास त्यांनी जवळच्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड हॉस्पीटल किंवा 07232-239515 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

 

गृह विलगीकरणाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या युवकावर गुन्हा दाखल : मौजे हिवरी येथील अमोल देवीदास पवार (वय 42) हा दुस-या जिल्ह्यातून हिवरी येथे आला होता. नियमानुसार त्याची आरोग्य तपासणी करून त्याला गृह विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले. ग्रामस्तरीय समितीने त्याच्या घरी भेट दिली असता सदर व्यक्ती घरात न थांबता सतत बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत ग्राम समितीने घरच्या सदस्यांना विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हिवरीचे तलाठी यांच्या तक्रारीवरून अमोल पवारविरुध्द भा.दं.वि.कलम 188 नुसार यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी