जिल्ह्यात दिवसभरात नऊ पॉझेटिव्ह रुग्णांची भर, एकाला सुट्टी


यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात नऊ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.  तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला एक रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. आज (दि. 18) नव्याने आलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांमध्ये पुसद शहरातील चार, दारव्हा शहरातील चार आणि एक जण नेर येथील आहे. यात सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

पुसद येथील 20, 25, 27 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिला, दारव्हा येथील 29 आणि 54 वर्षीय पुरुष तर 35 आणि 55 वर्षीय महिला तसेच नेर येथील 35 वर्षीय पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बुधवारपर्यंत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 42 होती. यात आज एका जणाला सुट्टी झाल्यामुळे ही संख्या 41 वर आली. मात्र गुरवारी नव्याने नऊ पॉझेटिव्ह वाढल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50 वर पोहचली आहे.  

गत 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 171 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी नऊ पॉझेटिव्ह तर 162 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शासकीय महाविद्यालयाने गुरुवारी 14 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 2992 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 2961 प्राप्त तर 31 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 207 वर पोहचली आहे. यापैकी 149 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर जिल्ह्यात आठ कोरोनाबाधितर रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी