लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत १५० जणांना प्रशिक्षण ; अर्ज आमंत्रित

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील प्रशिक्षणासाठी या आर्थिक वर्षाकरिता १५० प्रशिक्षणार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. विविध प्रशिक्षणासाठी मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील प्रशिक्षणार्थींनी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाड़ी कॅम्प, दारव्हा रोड यवतमाळ येथे करावे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी हा मातंग समाजाचा व तत्सम बारा पोट जातीतील असावा. तो महाराष्ट्रातील रहिवासी असून वय १८ ते ५० असावे. प्रशिक्षणार्थीने या पूर्वी शासनाच्या महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसून वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा नसावे, तसेच आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा. दिव्यांग प्रशिक्षणार्थीना ५ टक्के आरक्षणानुसार प्राधान्य देण्यात येईल. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशनकार्ड, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार लिंक पासबुक प्रत, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी