उत्पादन वाढीसाठी पिकाची फेरपालट करणे काळाची गरज - डॉ. शरद गडाख

शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी शेती पुरक व्यवसाय केले पाहिजे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून मार्गदर्शन घ्यावे. उत्पादन वाढविण्यासाठी पिकांची फेरपालट करणे काळाजी गरज असल्याचे मत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले. कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे दि. 3 फेब्रुवारी रोजी 22 व्या शास्त्रीय सल्लागार समितीची सभा संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. खरीप व रब्बी हंगामामध्ये पिकांविषयी येणाऱ्या अडचणी विषयी नियोजन शास्त्रीय सल्लागार समितीमार्फत केले जाते. तसेच जिल्ह्यामध्ये कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी बाबत वेळोवेळी विषय तज्ञांनी मार्गदर्शन व विद्यापिठाचे विकसीत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहचविले जाईल यावर कार्य करावे, असे आवाहन संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी यावेळी केले. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत निर्माण झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करण्याचे काम कृषि विज्ञान केंद्राने करण्याकरीता सहकार्य करावे. तसेच पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने आत्माअंतर्गत तयार झालेल्या बचत गटांना प्रक्रिया उद्योगाकरीता प्रोत्साहित करून वेळोवेळी मार्गदर्शन करावे, अशी विनंती प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी यावेळी केली. शास्त्रीय सल्लागार समिती सभेचे सदस्य सचिव डॉ. सुरेश नेमाडे यांनी मागच्या सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयावर केलेल्या कार्यवाही बद्दल माहिती दिली. शास्त्रीय सल्लागार समिती सभेचे महत्त्व विषद करून सदर सभा तसेच पुढील कार्यकमाची दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रास्ताविकात नमुद केले. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ मयुर ढोले, डॉ. प्रमोद मगर, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. गणेश काळुसे, प्रा. स्नेहलता भागवत यांनी आपल्या विभागाचा कार्य अहवाल सादर केला. यावेळी सलंग्न विभागाचे सदस्य, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे, महाविजचे जिल्हा व्यवस्थापक विनोद देशमुख , डीआरडीए जि. प. यवतमाळचे प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, प्रतिनिधी रवी मेश्राम, आकाशवाणी कृषी विभागचे मंगला माळवे, मत्स्यव्यवसायचे सहायक आयुक्त महाडीक, अग्रणी बँकेचे प्रबंधक अमर गजभीये, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तचे प्रतिनिधी डॉ प्रदिप नागापुरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ नंदकिशोर हिरवे, जिल्हा कृषि विकास अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी पंकज बर्डे, प्रभारी अधिकारी डॉ. अशितोष लाटकर, प्रतिनीधी पाटील मॅडम, सामाजिक वनीकरण विभागाचे राजेश कांबळे, आय सी आय सी आय, फांऊडेशन, यवतमाळ तथा आमंत्रीत शेतकरी बांधव सुनिलभाऊ घावडे, निलेशभाऊ टाके, हरीषभाऊ काळे, जगदीशभाऊ चव्हाण, विकास क्षिरसागर, बहूभाऊ मोहुर्ले तसेच विद्यापिठातंर्गत राबवित असलेल्या मॉडेल कॉलेजच्या गावाचे प्रतिनिधी म्हणून कृष्णाभाऊ वाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर ढोले तर आभार डॉ. प्रमोद मगर, यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी