कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसदच्यावतीने प्रकल्पातील तालुक्यांमध्ये कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे व स्वयंसेवी संस्थांनी योजनेंतर्गत विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुसद प्रकल्पातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, उमरखेड व नेर या तालुक्यातील आदिवासी भागात विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र सेवाभावी स्वयंसेवी संस्थांनी योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याकरीता विहीत नमुन्यातील आवेदन व परीपुर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद येथे दिनांक २६ फेब्रुवारी पर्यंत सादर करावे. योजनेच्या विवाह सोहळ्यात वर व वधु यांचे वय विवाहाच्या दिनांकास ३५ वर्षापेक्षा जास्त असू नये, वधु वराचा प्रथम विवाह असणे आवश्यक आहे, नवदाम्पत्यापैकी एकजन अनुसूचित जमातीचा असावा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व जोडप्यापैकी एकाचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायदा अंतर्गत कोणत्याही कलमाचा भंग झालेला नसल्याचे प्रतिज्ञापत्र, विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. वधु व वराचे बँक खाते क्रमांक जोडणे आवश्यक आहे. विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रति १० जोडपे १० हजार व लग्न सोहळ्यात भाग घेणाऱ्या जोडप्याना १० हजार इतके अनुदान देण्यात येते, असे प्रकल्प कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी