पोलिस विभागाच्या 12.50 कोटींच्या कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन




यवतमाळ दि. 18 : यवतमाळ येथील पोलिस अधीक्षक कार्यालय, पळसवाडी पोलिस वसाहतीचे विस्तारीकरण तसेच यवतमाळ शहर पोलिस स्टेशन इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक नूरुल हसन, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीवार उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभाग, यवतमाळ जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अंतर्गत पोलिस अधीक्षक कार्यालयाच्य इमारतीचे विस्तारीकरण करण्याकरीता 5 कोटी रुपये, शहर पोलिस स्टेशनची नवीन इमारत बांधण्याकरीता 5 कोटी रुपये व पळसवाडी यवतमाळ येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे विस्तारीकरण व अनुषंगिक कामाकरीता 2.49 कोटी रुपये असे एकूण 12 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, नगरसेवक जगदीश वाधवाणी, अजय राऊत, चंद्रभागा मडावी यांच्यासह पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस मुख्यालय, शहर पोलिस स्टेशन, अवधुतवाडी, लोहारा येथील पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी