महिला बचत गटाचे बँक खाते उघडण्याची प्रक्रिया नियमित ठेवा - पालकमंत्री मदन येरावार




यवतमाळ दि. 19 : विविध लिंकेजच्या माध्यमातून शासन महिला बचत गटांसाठी योजना राबविण्यात आले. याचा प्रत्यक्ष लाभ या बचत गटांना होत असून त्यांचे आर्थिक व्यवहार बँकांशी संलग्न आहेत. त्यामुळे महिला बचत गटासाठी बँक खाते असणे अत्यावश्यक झाले आहे. बँकांनी या गोष्टीकडे गांभिर्याने लक्ष देऊन महिला बचत गटाचे खाते उघडण्याची प्रक्रिया नियमित सुरू ठेवावी, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या खात्यासंदर्भात आयोजित बँकर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
बचत खाते उघडणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यात खंड पडू देऊ नका. रोजच्या कामाच्या व्यतिरिक्त्‍ महिला बचत गटांचे खाते उघडले जात आहे, हा संदेश जाणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित पशुसखींनी लक्ष द्यावे. महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्याला शासनाचे प्राधान्य आहे. बचत गटांचे खेळते भांडवल 15 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. या निधी 1 लक्ष पर्यंत करण्याचे नियोजन आहे. महिला बचत गटाकडून 99 टक्के कर्जाची परतफेड केली जाते, या गोष्टीचा विचार करून महिला बचत गटांना खात्यांपासून वंचित ठेवू नका, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी