27 सप्टेंबरपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात


यवतमाळ दि , 25 : विधानसभा निवडणूकीची अधिसुचना 27 सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येत असून या दिनांकापासून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्याला सुरुवात होईल. नामनिर्देशनपत्र छाननीच्या दिवसाच्या आधी 3 महिन्याच्या कालावधीतील 2 सेमीं X 2.05 सेंमी. आकाराचा उमेदवाराचा फोटो असणे आवश्यक आहे. पांढरी पृष्ठ भुमी असलेला आणि पूर्ण चेहरा दिसेल असा डोळे उघडे असलेला कृष्णधवल अथवा रंगीत छायाचित्राच्या मागील बाजूस स्वाक्षरी आवश्यक आहे. तसेच याबाबतचे विहीत नमुन्यातील सत्यापन देखील उमेदवार, त्यांचा ‍निवडणूक प्रतिनिधी अथवा सूचक यांच्याकडून घ्यावयाचे आहे.
नामनिर्देशन पत्राकरीता राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांकरीता 1 सूचक व इतरांकरीता 10 सूचक लागतील. नाम‍निर्देशनाच्या कालावधीत विशेषत: शेवटच्या दिवशी उमेदवार अथवा सूचक सर्व कागदपत्रांसह 3 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात हजर असले पाहिजे. नंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात प्रवेश देता येणार नाही. सर्वसाधारण उमेदवारासाठी अनामत रक्कम 10 हजार रुपये व अनु.जाती / जमातीच्या उमेदवारासाठी अनामत रक्कम 5 हजार रुपये आहे. अर्ध्या अनामत रकमेसाठी जात प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत नमुना – 26 मधील प्रतिज्ञालेख द्यावयाचा आहे. हा प्रतिज्ञालेख पब्लीक नोटरी मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा कमिश्नर ऑफ ओथ यांच्या समक्ष स्वाक्षरीत केला असला पाहिजे. प्रतिज्ञालेख नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत दाखल करता येईल.
उमेदवाराने प्रत्यक्ष शपथ घेणे आवश्यक आहे. शपथ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर घेतली नसल्यास अथवा उमेदवार बंदीवासात असल्यास त्या बंदीवासाचा अधीक्षक, प्रतिबंधात्मक स्थानबध्दतेत असल्यास डेन्शन कॅम्पचे कमांडन्ट यांच्या समक्ष, अत्यंत आजारी असल्यास वैद्यकीय अधीक्षक यांच्या समक्ष अथवा उमेदवार परदेशात असल्यास डिप्लोमॅटीक किंवा कौन्सुलर रिप्रेजेंटेटीव्ह यांच्या समक्ष शपथ घेऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष शपथ घ्यावयाची असल्यास छाननीचे आधीचे दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत शपथ घेणे आवश्यक आहे. शपथ नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर घेता येते. त्याआधी घेतलेली शपथ अथवा तसे प्रमाणपत्र चालणार नाही.
राष्ट्रीय, राज्य अथवा इतर नोंदणीकृत पक्षातर्फे उमेदवार उभा असल्यास एबी फॉर्म नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येईल. उमेदवाराला नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर नमुना – 8 मध्ये द्विप्रतीत निवडणूक प्रतिनिधीची (इलेक्शन एजेंट) नेमणूक करता येते. नमुना – 9 मध्ये निवडणूक प्रतिनिधी बदलण्याची मुभा उमेदवाराला आहे. ज्या व्यक्तीला सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. अशा व्यक्तीला निवडणूक प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी अथवा गणना प्रतिनिधी नेमता येत नाही.
उमेदवारांना तात्पुरते प्रचार कार्यालयासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत असे कार्यालय असल्यास त्या ठिकाणी प्रचार होता कामा नये. वाहनांची परवानगी विधानसभा मतदारसंघनिहाय संबंधीत उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देतील. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील वाहनांची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातून दिली जाईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.




            असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणे - शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतीम दिनांक - शुक्रवार 4 ऑक्टोंबर 2019
नामनिर्देशन पत्रांची छाननी - शनिवार 5 ऑक्टोबर 2019
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिनांक - सोमवार 7 ऑक्टोबर 2019
मतदानाचा दिनांक - सोमवार 21 ऑक्टोबर 2019
मतमोजणीचा दिनांक - गुरुवार 24 ऑक्टोबर 2019
निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्याचा दिनांक - रविवार 27 ऑक्टोंबर 2019

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी