प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याबाबत जनजागृती



Ø जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारं

यवतमाळ, दि. 16 : यवतमाळ जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना तीन वर्ष म्हणजेच सन 2020-21, 2021-22 व 2022-23 च्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांकरीता लागू आहे. या योजनेंतर्गत विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करणे तसेच शेतकऱ्याचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या हस्ते वाहनांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

फिरत्या वाहनांद्वारे जिल्ह्यातील 16 तालुक्यात इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्याद्वारे प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक सचिन सुरवसे, जिल्हा व्यवस्थापक अर्जुन राठोड उपस्थित होते.

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2020-21 खरीप हंगामाकरीता लागू करणेबाबत शासनाने 29 जून 2020 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त हप्ता खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. सदर योजनेची अंतिम दिनांक 31 जुलै 2020 आहे. यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-21 विमा कंपनी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, 6 वा मजला, सुयोग प्लॅटीनम, मंगलदास रोड, पुणे – 411001, दुरध्वनी क्रमांक 020-67278900 टोल फ्री क्र. 1800, 103, 5499 agrimh@iffcotokio.co.in या कंपनीची निवड केली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत खरीप ज्वारी विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये असून शेतकऱ्यांना भरावयाचा पीक विमा हप्ता 500 रुपये आहे. सोयाबीनकरीता संरक्षित रक्कम 40 हजार रुपये असून पीक विमा हप्ता 800 रुपये, मुगकरीता 20 हजार रुपये असून पीक विमा हप्ता 400 रुपये, उडीदकरीता 20 हजार रुपये असून पीक विमा हप्ता 400 रुपये, तुरकरीता 35 हजार रुपये असून पीक विमा हप्ता 700 रुपये आणि कापूसकरीता संरक्षित रक्कम 40 हजार रुपये असून शेतक-यांना भरावयाचा पीक विमा हप्ता 2 हजार रुपये आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी