जिल्ह्यात 40 पॉझेटिव्ह रुग्णांची भर


Ø 16 जणांना डिस्चार्ज

यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज (दि.28) पुन्हा 40 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 16 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

  मंगळवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 40 जणांमध्ये 23 पुरुष व 17 महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा येथील मजीद वार्डातील 17 पुरुष व 14 महिला, पुसद येथील 3 पुरुष व 2 महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील दोन पुरुष व एक महिलेचा समावेष आहे. 

जिल्ह्यात सोमवारपर्यंत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 300 होती. यात आज 40 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 340 वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 16 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 324 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 292 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 32 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 852 झाली आहे. यापैकी 502 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 26 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 100 नमुने तपासणीकरीता पाठविले. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 14251 नमुने पाठविले असून यापैकी 12408 प्राप्त तर 1843 अप्राप्त आहेत. तसेच 11556 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००


Comments

  1. Please deploy antigen test kits at Pandarkavda for faster tracing. Urgent

    ReplyDelete
  2. Absolutely 3 days 100+ patients, and patiets are running out of covid isolation wards.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी