जिल्ह्यात दिवसभरात नऊ पॉझेटिव्ह ; आठ जणांना सुट्टी


यवतमाळ, दि. 4 : शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात नऊ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले आठ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज (दि.4) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या नऊ जणांमध्ये यवतमाळ शहरातील एका पुरुषाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. तर नेर शहरातील चार पुरुष आणि चार महिला पॉझेटिव्ह आले आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 62 होता. यात शनिवारी नऊ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या 71 वर गेली. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या आठ जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 63 झाली आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 89 जण भरती आहे.  

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 40 रिपोर्ट प्राप्त झाले. यात नऊ पॉझेटिव्ह, 30 रिपोर्ट निगेटिव्ह तर एका नमुन्याचे अचूक निदान झाले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 313 वर पोहचला आहे. यापैकी तब्बल 240 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 10 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी 13 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 5414 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 5176 प्राप्त तर 159 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4863 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

0000000

Comments

  1. सर, कोरोना पासून नेर मधील किती लोक प्रभावित झाले आहेत? कृपया नंबरची पुष्टी करा आणि आपण काय करीत आहात? ते थांबविण्यासाठी?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी