जिल्हा प्रशासन व डीजीटल ग्रीन पार्क स्कूलच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम





यवतमाळ, दि. 04 : जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालय आणि शहरातील गेडामनगर येथील डीजीटल ग्रीन पार्क स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सुरवातीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे, बाभुळगावचे तहसीलदार आनंद देऊळगावकर, नायब तहसीलदार (निवडणूक) रुपाली बेहरे आदी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. सुदृढ लोकशाहीकरीता प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीत आपण स्वत: आणि परिसरातील इतरही लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदान जागृती मोहिमेच्या रॅलीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. सदर रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात फिरुन घरोघरी मतदान जनजागृतीबाबत पत्रके वाटण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन संजय चुनारकर यांनी केले. यावेळी न.प. प्रशासन अधिकारी योगेश डाफ, महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य स्वाती उगेमुगे, डॉ. विजय अग्रवाल, केंद्रप्रमुख कैलास पराते, अरुण धाये, मुख्याध्यापिका ज्योती सावळकर, वैशाली गायकवाड, धर्मा पवार, शीतल बागडे, दिपकसिंग राठोड यांच्यासह जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय येथील कर्मचारी,  महात्मा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राध्यापक आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी