विधानसभेसाठी जिल्ह्यात 136 उमेदवारांचे 205 नामांकन



यवतमाळ, दि. 05 : जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (4 ऑक्टोअखेर) एकूण 136 उमेदवारांनी 205 नामांकन दाखल केले. यात 76 – वणी विधानसभा मतदारसंघांत 21 उमेदवारांनी 34 नामांकन, 77 – राळेगाव विधानसभा मतदारसंघात 20 उमेदवारांनी 28 नामांकन, 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 26 नामांकन,  79 – दिग्रस विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 21 नामांकन, 80 – आर्णि विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 24 नामांकन, 81 – पुसद विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवारांनी 27 नामांकन आणि 82 – उमखेड विधानसभा मतदारसंघात 31 उमेदवारांनी 45 नामांकन दाखल केले आहेत.
विधानसभेकरीता नामनिर्देशन दाखल करण्यासाठी 27 सप्टेंबरपासून सुरूवात झाली. या दिवशी सातही विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल झाले नाही. दि. 30 सप्टेंबर रोजी 3 उमेदवारांचे 4 नामांकन, दि. 1 ऑक्टोबर रोजी 6 उमेदवारांचे 7 नामांकन, दि. 3 ऑक्टोबर रोजी 36 उमेदवारांचे 50 नामांकन आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी 103 उमेदवारांचे 144 नामांकन दाखल करण्यात आले.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी