मतदार जनजागृतीबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक




11 ऑक्टोबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन
यवतमाळ दि. 10 : आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती करण्यात येत आहे. यात चित्ररथ, पथनाट्य, मतदारांना आवाहन, रॅली आदींचा समावेश आहे. याच अनुषंगाने 11 ऑक्टोबर रोजी यवतमाळ शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी मतदार जनजागृतीकरीता सायकल रॅलीचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व सामाजिक संघटनांची बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मतदार जनजागृतीकरीता जिल्ह्यातील तीन दिवस होणा-या सायकल रॅलीत डॉक्टर्स असोसिएशन, क्रीडा भारती, सायकलिस्ट ग्रुप, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. तसेच प्रत्येक शाळांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांच्या परिसरात घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचे करण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापकांनी नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन राठोड, श्री. दरणे, इंडीयन मेडीकल असोसिएशनचे डॉ. मानकर, शिक्षणाधिकारी श्री. चवणे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांच्यासह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी