नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक हरकती व सुचना 18 ते 26 नोव्हेंबरपर्यंत आमंत्रित

 


यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, बाभुळगाव, महागाव, झरीजामणी आणि मारेगाव या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता  सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यातील वरील सहाही नगरपंचायतीच्या यापुढे होणा-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता शहराची विभागणी नवीन प्रभागात केली आहे.

त्यानुसार उपरोक्त नगरपंचायतींचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सीमा प्रदर्शित केलेल्या प्रारुप रचनेचा मसुदा तसेच सदस्य पदाचे आरक्षण संबंधित नगरपंचायत (कळंब, राळेगाव, बाभुळगाव, महागाव, झरीजामणी आणि मारेगाव) व संबंधित तहसील आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ कार्यालयाच्या सुचना फलकावर तसेच yavatmal.nic.in या संकेतस्थळावर 18 नोव्हेंबर 2020 रोजी पर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहे.

उपरोक्त नगर पंचायत क्षेत्रातील ज्या नागरिकांना या संबंधात काही हरकती व सुचना दाखल करावयाच्या असतील, त्यांनी नगर पालिका प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे 18 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात कारणासह सादर कराव्यात. त्यानंतर येणा-या हरकती व सुचना विचारात घेण्यात येणार नाही. ज्या कोणत्याही व्यक्तिचे लेखी हरकती व सुचना जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होतील, त्यावर 10 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी घेतील, याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी