विधी सेवा तर्फे जागतिक बाल कामगार विरोधी दिवस साजरा

यवतमाळ, दि २७ जून, (जिमाका):-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सरकारी कामगार अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने १२ जुन २०२३ रोजी “जागतिक बाल कामगार विरोधी दिवस”प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांचे मार्गदर्शनात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए.नहार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे,जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रकाश नानजी चाहणकर,दुकाने निरीक्षक विजय गुल्हाणे उपस्थित होते. याप्रसंगी सरकारी कामगार अधिकारी रा.रा.काळे यांनी उपस्थीतांना बाल कामगार विरोधी दिवसाबाबत विस्तृत माहिती दिली.तसेच १ ते १४ वर्षाच्या मुलांना व मुलींना कामावर ठेवता येत नाही तसेच त्यांना ठेवल्यास आस्थापना मालकास २० ते ५० हजार रुपयांचा दंड व २ ते ३ वर्षाची शिक्षा किंवा यापैकी दोन्ही होवू शकते याबाबत विस्तृत अशी माहिती दिली.तसेच १४ वर्षावरील मुलांना शाळेच्या वेळेवर सुट्टी देणे,दोन ते तिन तासांनी त्याला ब्रेक देणे यासह इतर सर्व सोयी सुविधा पुरविणे हे आस्थापना मालकाला बंधनकारक असून त्यांना धोकादायक जागी कामावर ठेवता येत नसल्याचेही सांगितले. यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए.नहार यांनी १ ते १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना कामावर ठेवल्यास कायदेशीर कारवाई करता येते.व २० ते ५० हजार रूपयाचा दंड करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे.असे सविस्तर बाल कामगार कायद्या बाबत सांगण्यात आले. सदर कार्यक्रमास पॅरा विधी स्वंयसेवक,सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालय,यवतमाळ चे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी