तंत्रशिक्षण पदविका व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

यवतमाळ, दि ९ जून, (जिमाका):-येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना २१ जून २०२३ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणारआहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी http://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी,तसेच पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाईन नोंदणी मुदत १ जून ते २१ जून २०२३,तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द दि.२३ जून २०२३,आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत २४ जून ते २७ जून २०२३,अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द दि.२९ जून २०२३ असून दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे,त्यांचे समुपदेशन करणे व प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शासकिय तंत्रनिकेतन,यवतमाळ येथे सुविधा केंद्र १०११ निर्मिती करण्यात आलेली असून अर्ज नोंदणी संदर्भात मदत केली जाणार आहे,असे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.रा.पां.मोगरे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी