उमरखेड येथे १३ जूनला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १५२७ जगांसाठी होणार निवड

यवतमाळ, दि 8 जून (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड यांचे संयुक्त विद्यमाने १३ जून सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरखेड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एकूण १५२७ रिक्तपदे विविध नामांकित कंपन्या सुझुकी मोटर्स, गुजरात, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, यवतमाळ, व्हेरॉक इंजिनिअरींग, वाळुज, औरंगाबाद, धुत ट्रान्समिशन, औरंगाबाद, मेगाफिड बायोटेक, नागपूर, सहयोग मल्टीस्टेट क्रेडि को ऑप सोसा. नागपूर / यवतमाळ, क्वेस कॉर्प लि-टाटा मोटर्स पूणे यांच्याकडून उपलब्ध झालेली आहे. सदर मेळाव्यामध्ये १० वी, १२ वी, आय.टि.आय, पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा , असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी