प्रोत्साहनपर लाभ योजना: शेतकऱ्यांनी ५ जून पर्यंत आधार प्रमाणिकरण करावे.

यवतमाळ, दि. २ जून (जिमाका):- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी सुरु असुन या योजनेंतर्गत विशिष्ठ क्रमांकाचे यादीत नाव समाविष्ठ असलेल्या परंतू आधार प्रमाणिकरण न झालेल्या मयत / वारस लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणिकरणाची सुविधा दिनांक ५ जुन,२०२३ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. विशिष्ठ क्रमांकाचे यादीमधील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केलेले नाही त्यांना प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ मिळू शकणार नाही. विशिष्ठ क्रमांकांचे यादीत नाव असलेल्या व अजुनही आधार प्रमाणिकरण न केलेल्या सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जवळचे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन दिनांक ५ जून पर्यंत प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद