बालसंस्कार केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांकडुन प्रस्ताव आमंत्रित

यवतमाळ, दि १९ जून जिमाका:- जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेंतर्गत नाविन्यपुर्ण योजना सन 2022 -23 मधुन कोलाम पोडावर बालसंस्कार केंद्र सुरु करण्याची योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. अनुसूचित जामातीच्या 3 ते 12 वर्षे वयाच्या (कोलाम) मुलांकरीता कोलाम पोडवर 40 बालसंस्कार केंद्र सुरु करण्यासाठी नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थांकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. योजना राबविण्याचा कालावधी 10 महीने आहे. या योजनेकरीता अर्जदाराने प्रस्तावासोबत संस्थेची घटना, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, 3 वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल, कामाचा अनुभव कागदपत्रे, 5 लक्ष बँक सॉलवन्सी, प्रशिक्षण शुल्क दरपत्रक, कर्मचारी यादी, नाश्ता व निवास दरपत्रक ई. कागदपत्रे जोडावित. विहीत नमुन्यातील परिपुर्ण भरलेला अर्ज २७ जून पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालयास सादर करावा. नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालया दूरध्वनी 07235-227436 वर संपर्क साधावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकार तथा प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा याशनी नागराजन यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी