अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्या १० ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि, २७ (जिमाका):-सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणा-या मातंग समाजाला सक्षम करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाकडून समाजातील नागरिकांना उद्योग उभारण्यासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी १० ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. आर्थीक वर्ष २०२३-२४ करिता थेट कर्ज योजनेसाठी ४० लाभार्थी लक्षांक देण्यात आला आहे.थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा १ लक्ष रुपये आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षापर्यंत असावे. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपये असावे.तसेच अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर ५०० असावा जातीचा दाखला,आधार कार्ड, शैक्षणिक दाखला रेशनकार्ड, पॅन कार्ड, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणचीभाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा,शॉप अॅक्ट परवाना, व्यवसाय संबंधीत तांत्रिक प्रमाणपत्र, व्यवसायाचे दरपत्रक, तीन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, उत्पनाचा दाखला आधार लिंक बँक खात्याचा तपशिल,व्यवसाय संबंधीत प्रकल्प अहवाल,प्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने स्वांक्षाकीत करून जोडावित. योजनेचे कर्ज प्रस्ताव,महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज दि.१ जुलै ते १० ऑगस्ट २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पळसवाडी कॅम्प,दारव्हा रोड,यवतमाळ या ठिकाणी स्विकारले जातील.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी