दुध भेसळविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येणार

जिल्ह्यातील दुध भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश दुध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी पी. के. दुबे यांनी प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थात होत असलेली भेसळ आणि त्याचा जनतेवर होणाऱ्या परिणामाबाबत दुध भेसळ प्रतिबंधक समितीची नुकतीच बैठक झाली. यावेळी श्री. दुबे यांनी हे निर्देश दिले. राज्यात मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत असल्यामुळे या भेसळीला पायबंद करण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत दुध भेसळीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व दुध विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांनी उच्च प्रतिचे दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. दुबे आणि सचिव डॉ. जया राऊत यांनी केले आहे. जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीचे गठन : दुध भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक, अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक हे सदस्य असून जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतील.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी