हर घर तिरंगा उपक्रमांत गावखेड्यातील चार लाख घरांवर फडकला तिरंगा

देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील बाराशे ग्रामपंचायतींसह ग्रामीण भागातील सुमारे 4 लाख 27 हजार 793 घरांवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरातील बाराशे ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आले. यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमधील 31 हजार 780, आर्णी 27 हजार 215, बाभुळगाव 20 हजार 662, दारव्हा 27 हजार 590, दिग्रस 44 हजार 780, घाटंजी 19 हजार 685, कळंब 21 हजार 785, केळापूर 30 हजार 464, महागाव 24 हजार 908, मारेगाव 17 हजार 891, नेर 23 हजार 560, पुसद 44 हजार 250, राळेगाव 24 हजार 188, उमरखेड 35 हजार 320, वणी 33 हजार 500 आणि झरी जामणी 20 हजार 215 घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्याचबरोबर 15 ऑगस्ट स्वांतत्र्य दिनी बाराशे ग्रामपंचायतीमध्ये सरंपच आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवदंना देण्यात आली . ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांकडून पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी 77 हजार 550 दिवे लावून भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र्र बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची शपथ घेण्यात आली. तसेच वृक्ष लागवडीसंदर्भातील वसुधा वंदन उपक्रमातंर्गत बाराशे ठिकाणी अमृतवाटिकेसाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. देशभरातील नागरिकांना राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी आणि घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासंबधी प्रोत्साहन देण्यासाठी गेल्यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याची आवाहन केले आहे. या आवाहनानंतर देशभरात हर घर तिरंगा या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली असून त्यात शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी