नेरमध्ये श्रद्धांजली भवन बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांना यश नेरमधील मुस्लीम कब्रस्थानात श्रद्धांजली भवनासाठी ९९ लाख रुपयाच्या कामांना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली असून टिनाच्या श्रद्धांजली भवन बांधकामाचे आणि सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत ९९ लाख ७२ हजार २०० रुपयांच्या या कामांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. नगरपरिषदेमार्फत या श्रद्धांजली भवनाच्या बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी सौंदर्यीकरणाची कामे देखील केली जाणार आहे. नेर नगरपरिषद क्षेत्रात मुस्लीम बांधवांसाठी कब्रस्थानांत श्रद्धांजली भवन उभारण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी विशेष प्रयत्नातून जवळजवळ एक कोटी रुपयांचा निधी या भवनाच्या बांधकामासाठी उपलब्ध करुन दिला आहे. या श्रद्धांजली भवनाचे बांधकाम व सौंदर्यीकरणाच्या कामांचा दर्जा राखला जावा, अशा सूचना देखील पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केल्या.
या भूमिपूजन समारंभाला नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, नगरसेवक सुभाष भोयर, वैशाली ताई मासाळ, नगरसेवक तनविरखान शेरे अफगान खान, नगरसेविका आफरीन वाजीद खान, मुख्याधिकारी निलेश जाधव आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी