जिल्हास्तरीय एचआयव्ही जनजागृती स्पर्धा ; राळेगावचे इंदिरा गांधी कला महाविद्यालय प्रथम

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय एचआयव्ही जनजागृती स्पर्धेत राळेगाव येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालयाची पहिल्या क्रमांकावर निवड करण्यात आली.
जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पथनाट्य स्पर्धेत 11 रेड रिबन क्लब स्थापित महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी एचआयव्ही एड्स संक्रमणाचे मार्ग आणि एचआयव्ही एम बाबत समाजातील असणारा कलंक व भेदभाव कमी करणे. 1097 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करणे या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये यवतमाळ मधील महाजन नर्सिंग महाविद्यालयाची द्वितीय क्रमांकावर आणि आर्णी येथील म. द. भारती महाविद्यालयाची तृतीय क्रमांकावर निवड करण्यात आली.
या पथनाट्य स्पर्धेला प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रमा बाजोरिया, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगलपल्लेवार, एआरटी केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश बोरीकर, परिक्षक प्रिती दिपक दास आणि घाटंजी येथील नवचैतन्या बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत उपस्थित होते. या पथनाट्य स्पर्धेसाठी डाप्कू, आयसीटीसी कळंब, सवना, घाटंजी, दिग्रस व आर्णीच्या समुपदेशकांचे योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी