खेळाडू सवलत गुणाचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

खेळाडू, क्रीडा स्पर्धक यांना माध्यमिक १० वी व उच्च माध्यमिक १२ वी प्रमाणपत्र परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मिळणाऱ्या सवलत गुणाकरीता आवश्यक कागदपत्रांसह शाळा, महाविद्यालयांनी दि.३० मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सवलत गुणांसाठी प्रती विद्यार्थी २५ रुपये तपासनी शुल्क जमा करावयाचे आहे. तपासणी शुल्क जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सवलत गुणांचा प्रस्ताव शिफारस करतेवेळी अमरावती विभागीय शिक्षण मंडळ यांच्या नावे चलनाद्वारे किंवा रोखीने भरावयाचे आहे. शालेय स्पर्धेकरीता गुणांच्या सवलतीकरीता प्रस्ताव सादर करतांना प्राचार्य, मुख्यध्यापकाच्या पत्रासह परिशिष्ट-ई सोबत जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तरचे स्वतंत्रपणे प्रस्ताव जोडावे. विविध नमुन्यातील अर्ज १९ अंकी परिपूर्ण भरलेला असावा. खेळाडूचे प्रमाणपत्र व हॉल तिकीट, खेळाडू इयत्ता १२ वीत असल्यास १० वीचे बोर्ड सर्टीफिकेट, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांसह प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावे. प्रत्येक पेजवर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. एकविध खेळ संघटनेच्या स्पर्धेकरीता प्राचार्य, मुख्यध्यापक यांचे पत्र, परिशिष्ट १० सोबत संघटनेच्या स्पर्धाकरीता जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तरचे स्वतंत्रपणे प्रस्ताव लावावे. विविध नमुन्यातील १९ अंकी परिपूर्ण अर्ज, प्रमाणपत्र, हॉल तिकीट, खेळाडू इयत्ता १२ वीत असल्यास १० वीचे बोर्ड सर्टीफिकेट, आधारकार्ड, स्पर्धेचा संपूर्ण अहवाल, सहभागी खेळाडूंची यादी, स्पर्धेचे भाग्यपत्रक, खेळाडू प्रमाणपत्र, वितरण नोंदवही, स्पर्धेचा गुणांकन तक्ता, स्पर्धेचा अंतीम निकाल, स्पर्धेचे परिपत्रक असा प्रस्ताव ३ प्रतित सादर करावे. स्पर्धेच्या संपूर्ण अहवालानुसार प्रस्तावासोबत दस्ताऐवज लावणे आवश्यक आहे किंवा संघटनेद्वारे सदर अहवाल कार्यालयात हार्ड कॉपीनुसार विहित कालावधीत प्राप्त झाल्यास खेळाडूची शिफारस करण्यात येईल. अन्यथा सदरचा प्रस्ताव बोर्डास सादर करण्यात येणार नाही व त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी शाळा, महाविद्यालयाची राहील, असे जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी