कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन

वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शिल्पा पोलमेल्लीवार, उपशिक्षणाधिकारी प्रा.अंजली गहरवाल, प्रा.धिरज वसुले व डॉ. प्रशांत शिंगोटे उपस्थित होते. डॉ.शिल्पा पोलपेल्लीवार यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी समाजात जगत असतांना स्वत:ची क्षमता ओळखून जागरूक व सक्षम असले पाहिजे. स्वत:मधील चांगल्या विचारांचा विकास करून व वाईट विचार काढून स्त्रीयांचे तेज उसळत असते. जीवनात पुढे जात असतांना चिकित्सक व संशोधनात्मक दृष्टीकोन बाळगल्यास स्वत:चे कौशल्य विकसित करून कुटुंबासाठी व समाजात जगता येते, असे सांगितले. डॉ. पार्लावार म्हणाले की, न्यूयार्क येथे महिलांनी कामाच्या जागी सुरक्षितता, दहा तासांचे काम व मतदानाचा हक्क या मागण्या केल्या होत्या. स्त्रीयांचा सन्मान, कर्तृत्व, सशक्तीकरण आत्मनिर्भर व सामाजिक समानतेचे महत्व पटवून देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना अमानवी पद्धतीने वागविणाऱ्या समाज व्यवस्थेला विरोध करून स्त्रीयांना शिक्षण देवून परिवर्तनाची सुरुवात केली. भारतीय स्त्रीयांचा सर्वांगीन विकास हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. आज स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर दिसतात याचे श्रेय सावित्रीबाईंना जाते. महाराष्ट्राने महिलांना प्रगतीची दिशा दिली आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अंजली गहरवाल यांनी केले. सुत्रसंचालन विद्यार्थीनी दिशा निबारते हिने केले तर तेजस्विनी फरकाडे, अंकिता शांधिल्या, विधी शर्मा या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमास डॉ. पि. के प्रधान, एकनाथ भंकाळे, अस्मिता पाटील, शुभम धार्मिक व बंडू भालेकर, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी