राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली अँपचे प्रशिक्षण

भारत सरकारच्या कृषि आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या क्षेत्रीय केंद्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्र नागपुरच्यावतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली या अँपचे प्रशिक्षण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी अनिल राठी आणि कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे वैज्ञानिक डॉ.प्रमोद मगर यांनी कार्यक्रमात सहभागी राहुन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील 20 प्रगतिशील शेतकऱ्यांनी भाग घेतला. भारत सरकारच्या कीटकशास्त्र सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी छाया पासी, वनस्पती रोग विज्ञानचे सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी स्वाती भुंबर तथा वैज्ञानिक सहाय्यक आश्मिना धाडसे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना या अँपबद्दल माहिती दिली. या अँपमुळे शेतकऱ्यांना सहज पध्दतीने किडीची ओळख कसे करायची आणि अँपमध्ये डेटा फिडिंग करून तेव्हाच्या तेव्हा विभागाच्या सल्ल्याचा फायदा कसा घ्यायचा हे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. त्याच बरोबर एकात्मिक किड व्यवस्थापन, मित्र किडीची ओळख, कीटकनाशकांचा सुरक्षित आणि न्याय्य वापर आणि किड बिमारीची ओळख आणि त्यासाठीचे उपाय हे विषय सुद्धा या प्रशिक्षणामध्ये घेण्यात आले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी