रिझर्व्ह बँकेच्यावतीने क्षेत्रस्तरीय आर्थिक साक्षरता कार्यक्रम

आर्थिक साक्षरता सप्ताहानिमित्त विद्यार्थी आणि युवकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर कार्यालयाच्यावतीने यवतमाळ येथे क्षेत्रस्तरीय आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बँकेच्या तज्ञांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक शशांक हरदेनिया, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक जी.एल.नरवाल, भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक कौस्तव चक्रवर्ती, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दीपक पेंदाम, अग्रणी जिल्हा प्रबंधक अमर गजभिये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील एकूण 200 जण सहभागी झाले होते. त्यात परिसरातील विद्यार्थी, बचत गट, शेतकरी, लघु उद्योजक, व्यवसाय प्रतिनिधी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी आणि बँक अधिकारी यांचा समावेश होता. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या पदवीधरांनी त्यांची उत्पादने प्रदर्शित करणारे स्टॉलही या ठिकाणी लावले होते. चलनी नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये, डिजिटल बँकींग करताना काय करावे आणि काय करू नये, बँकांमधील तक्रार निवारण यंत्रणा आणि एकात्मिक लोकपाल योजना, फसव्या ऑफर्स आणि पॉन्झी योजनांपासून संरक्षण इत्यादींबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी कार्यक्रमादरम्यान विविध सत्रात मार्गदर्शन केले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी