विभागीय रोजगार मेळाव्यात 309 उमेदवारांची प्राथमिक निवड

* 20 नामांकित कंपन्यांची उपस्थिती * मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 309 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळावा उद्घाटन कार्यक्रमास एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय पांडे, विद्यापिठाच्या विद्यार्थी विभागाचे संचालक डॉ.राजीव बोरकर, लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दुर्गेश कुंटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे, कौशल्य विकास अधिकारी पी.बी.जाधव, वैशाली पवार उपस्थित होते. मेळाव्यात रतन असोसिएट्स, युनिमॅक्स इंडिया हेल्थ केअर सेंटर, अलाईट रिसोर्स मॅनेजमेंट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पीपीएस एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, संसूर सृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, धूत ट्रान्समिशन, विनय ऑटोमोबाईल, हिंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर, व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, नवभारत फर्टीलायझर, शिवकृपा व कोर्ट मॅनेजमेंट, किसान सेक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस, स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड, कल्पतरू स्कील डेव्हलपमेंट अकॅडमी, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, नॉन स्टॉप कार्पोरेशन, महिंद्रा अँड महिंद्रा इत्यादी 20 नामांकित कंपन्यांद्वारे त्यांच्याकडील 1 हजार 294 रिक्त पदांकरिता मुलाखती घेण्यात आल्या. या मेळाव्यामध्ये 531 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 309 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात करण्यात आली तसेच एका उमेदवाराची अंतीम निवड सुद्धा करण्यात आली. या मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जाती महामंडळ इत्यादी महामंडळाने उपस्थिती दर्शवली होती. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त द.ल.ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संजय मोहळ, प्रवीण आत्राम, सतीश शेळके, तुषार ठाकरे, पंकज कचरे, जिल्हा कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी