अन्न सुरक्षा अनुपालन प्रणाली प्रशिक्षण

राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत अनुदानित वसतिगृहातील अधीक्षक व स्वयंपाकी यांच्यासाठी फुड सेफ्टी कॉम्पलिअन्स सिस्टीम याविषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रम समाज कल्याण विभाग व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांचे सहाय्य लाभले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गो.वि.माहोरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश अन्न पदार्थ बनवताना व हाताळताना कशी काळजी घ्यावी व स्वच्छता कशी ठेवावी हा होता. सामाजिक न्याय भवन येथे आयोजित प्रशिक्षणात ८५ प्रशिक्षणार्थीना व दिनबाई मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह दिग्रस येथे आयोजित प्रशिक्षणात २०६ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही ठिकाणी प्रशिक्षक अस्मीता ठवकार यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थीना अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील तरतुदी, स्वच्छतेचे महत्त्व, विषबाधेसारख्या अप्रिय घटना टाळण्याच्या उपाययोजना, पौष्टिक घटकाची माहिती व स्रोत याबाबतची माहिती देण्यात आली. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी