यवतमाळ येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

जिल्ह्यात उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दि.७ मार्च रोजी हॉटेल हिरा पॅलेस दारव्हा रोड यवतमाळ येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या गुंतवणूक परिषदेमध्ये राज्यशासनासोबत सामंजस्य करार होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे जिल्ह्यांना विकासाचा केंद्र मानून व राज्याच्या विकासाला चालना देणे तसेच गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यय संधींबाबत चर्चा, सामंजंस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, उद्योजकांचे अनुभव कथन आदींचा समावेश असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्याच्या उत्पादनाचे प्रदर्शन, निर्यातक्षम उत्पादने, भौगोलिक नामांकन असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, विविध योजनांचे लाभार्थ्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या गुंतवणूक परिषदेमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी