नेर येथे १ कोटी ९५ लाखाच्या विकासकामांचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते नेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. या विकासकामांची एकून किंमत १ कोटी ९५ लक्ष इतकी आहे. भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांसह नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, भाऊराव ढवळे, सुभाष भोयर, रितेश चिरडे आदी उपस्थित होते. विकास कामांमध्ये नगर परिषदक्षेत्रांतर्गत वार्ड क्रमांक एक महादेव नगर मधील खुल्या जागेवर जेष्ठ नागरिक मंडळ योगा भवन बांधकाम करणे; खर्च ४० लाख. वार्ड क्रमांक एक संदीप नगर येथील विशाल राठोड ते नामदेव राठोड ते युवराज गजभिये ते बन्सोड ते हजारे ते घावडे ते गिरी व श्री.गादिया ते फिरके यांच्या घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे; खर्च १३ लाख ९१ हजार. वार्ड क्रमांक एक छत्रपती नगर येथील प्रदीप ठाकरे ते राजे संभाजी पार्क ते कापसीकर ते अवधुत परटक्के ते उघडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व कॉंक्रीट नाली; खर्च १८ लाख ९५ हजार. वार्ड क्रमांक तीन चिंतामणी चौक ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत कॉक्रिट रस्ता व नाली; खर्च १८ लाख ९८ हजार. वार्ड क्रमांक चार मधील श्रीराम मंदीर ते राजाभाऊ देशपांडे ते सुनील तिडके ते ढोके व परतवार ते इम्तीयाज सेट पर्यंत काँक्रिट रस्ता; खर्च ९ लाख ९७ हजार. वार्ड क्रमांक सहा वलीसाहब नगर मधील अलीम सर ते फईम बेकरी पर्यंत रस्ता डांबरीकरण व काँक्रिट नाली; खर्च १४ लाख ९३ हजार. वार्ड क्रमांक आठ नवाबपूर येथील इलिगंट हायस्कूल ते लेंडी नालापर्यंत रस्ताचे डांबरीकरण करणे; खर्च ३० लाख ८९ हजार. वार्ड क्रमांक सात नवाबपूर मस्जिद ते अब्बास भाई ते सादिक कुरेशी यांच्या घरापर्यत कॉक्रिट रस्ता; खर्च १९ लाख ९० हजार. वार्ड क्रमांक तीन गांधी नगर येथील शैलेश गुल्हाने ते नगाजी महाराज मंदीर पर्यंत काँक्रिट रस्ता; खर्च १३ लाख ९३ हजार. वार्ड क्रमांक तीन गांधी नगर येथील प्रल्हाद बनकर ते देशमुख यांच्या घरापर्यंत कॉक्रिट रस्ता; खर्च १३ लाख ९४ हजार ईतका होणार आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी