पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पंचसूत्री

सद्यस्थितीत हवामान बदलामुळे शेतीव्यवसायात काहिशी अनिश्चितता निर्माण झाली आहे. शेतीला पूरक किंबहुना मुख्य व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाशी संबंधित व्यवसायाची वाट निवडणे गरजेचे बनले आहे. त्यामुळेच यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासोबतच दुध व पशुधनात वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पंचसूची आणली आहे. यामुळे पशुधानाचे क्षेत्र विस्तारले जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा शेतकरी बांधवांना लाभ देत त्यांच्यामध्ये पुन्हा नवी उमेद जागविण्याचा व नवीन पशुउद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभाग या पंचसूचीच्या माध्यमातून करीत आहे. आगामी काळात राज्यात केवळ संख्यात्मक नाही, तर गुणात्मक पशुधनाची पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रगत तंत्रज्ञानाच्या पथावर सर्जनशीलतेला गवसणी घालत आधुनिकतेकडे मार्गस्थ आहे. सुंदर, संपन्न व प्रगत महाराष्ट्राच्या या आश्वासक स्थित्यंतरात पशुसंवर्धन खात्यानेही ग्रामीण व पर्यायाने शहरी अर्थचक्र गतिमान करण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. शाश्वत, आश्वासक व निर्णायक विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत पशुसंवर्धन विभाग यापुढेही विविध माध्यमातून समग्र प्रयत्न करीत राहणार आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये काम करतांना पशुपैदास सुधारणा, पशुधनाचे आरोग्य, वैरण विकास, पशुखाद्य आणि पशुधनाचे व्यवस्थापन ही पंचसुत्री अमलात आणली आहे. पशुपैदास सुधारणा या कार्यक्रमामध्ये अनुवांशिक सुधारणा व नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च गुणावत्ता व उत्पादकता असलेल्या पशूंची निर्मिती व त्यांच्या नवीन जातींची ओळख करून त्यांची उत्पादकता वाढविणे याचा समावेश आहे. पशुधनाचे आरोग्य यामध्ये प्रतिबंधात्मक, प्रवर्तक, उपचारात्मक उपाययोजना करून पशुउद्योजकांना गुणवत्तापूर्ण पशुवैद्यकीय सेवा देणे. वैरण विकास यामध्ये उच्च पोषणमूल्य असलेल्या पौष्टिक वैरणीची निर्मिती करणे, मुरघास, वैराणीच्या विटा, अशा स्वरूपाच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, पशुखाद्य यामध्ये उच्च पोषणमूल्य असलेल्या व पौष्टिक पशुखाद्याचा उत्पादनास व वापरास प्रोत्साहन देणे, याबाबींचा समावेश आहे. पशुधनाचे व्यवस्थापन यामध्ये पशु व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे व त्यास चालना देणे, असा उद्देश आहे. पशुपालकांना पशुउद्योजक म्हणून त्यांचा कायापालट करण्यासाठी आपल्याला पूर्ण शक्तीनिशी काम करावयाचे आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या उपाययोजनाद्वारे ग्रामीण अर्थचक्र गतिमान होण्यास हातभार लागणार आहे, असे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे. जिल्ह्यातील पशुधन यवतमाळ जिल्ह्यात आजमितीसी गायवर्ग 5 लाख 96 हजार 113 इतके पशुधन आहे. म्हैसवर्ग 88 384, शेळ्या 3 लाख 49 हजार 979, मेंढ्या 22 हजार 587 तर कुक्कुटवर्गीय 5 लाख 71 208 इतके पशुधन आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी