आज जागतिक ग्राहक दिन व प्रदर्शनीचे आयोजन

दरवर्षी दि.१५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातून उद्या दि.१५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्राहक दिन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम अन्न व औषध प्रशासन विभाग, वैधमापन शास्त्र विभाग, एस.टी. महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत संचार निगम लिमिटेड, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त गोपाल मोहोरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉ.नारायणराव मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदीया, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ आडे हे उपस्थित राहणार आहेत. पोलिस विभागाकडून सायबर क्राईम अंतर्गत सायबर सेल येथील प्रशिक्षीत अधिकारी यावेळी मार्गदर्शन करणार आहे. विज वितरण कंपनी कार्यालयाकडून सौर ऊर्जेसंबंधातील माहितीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित प्रदर्शनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्वांना पहावयास खुली राहणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी