तणावातही पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात - पालकमंत्री संजय राठोड

पोलिस विभाग अत्यंत महत्वाचा विभाग आहे. समाजात शांतता, अलोखा राखण्याचे काम या विभागातील अधिकारी, कर्मचारी करत असतात. अलिकडे पोलिस विभागाचे काम प्रचंड वाढले आहे. कर्मचाऱ्यांची देखील कमतरता आहे, असे असतांना देखील प्रामाणितपणे कर्तव्य बजावले जातात, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने येथील कवायत मैदान येथे बांधण्यात आलेल्या आरोग्यम् पोलिस हेल्थ क्लबचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे आदी उपस्थित होते. अलिकडे मोबाईल, इंटरनेटमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. अशा गुन्हेगारीवर आळा घालने फार मोठे आवाहन आहे. आमचा पोलिस विभाग समर्थपणे या आवाहनाचा सामना करत आहे. पुर्वी पोलिसांकडे ठराविक कामे होती. अलिकडे पोलिस विभागाचे कार्यक्षेत्र देखील वाढले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच सामाजिक पोलिसिंग करावी लागते. त्यामुळे खाकी वर्दितीत पोलिस शिपाही खऱ्या अर्थाने समाजाचा मित्र म्हणून आता ओळखल्या जावू लागला आहे. याठिकाणी सुरु करण्यात आलेला हेल्थ क्लब कामाचा ताण घालविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी बजावतांना आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असे पालकमंत्री म्हणाले. आ.मदन येरावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शरीर, मन तंदुरुस्त राहीले तर निकोप विचारांना चालना देते. पोलिस विभागाचे काम फार तान तणावाचे आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. या ठिकाणी सुरु करण्यात आलेला क्लब खाजगी क्लबपेक्षाही उत्तम आहे. त्याची देखभाल दुरुस्ती देखील उत्तम रहावी, असे आ.येरावार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन गोपाळ पाटील यांनी केले. सुरुवातीस पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी हेल्थ क्लब नामफलकाचे अनावरण करून उद्घाटन केले. त्यानंतर येथील सोई-सुविधांची पाहणी केली. अवधूतवाडी पोलिस स्टेशन ईमारत बांधकामाचे भूमिपूजन येथील पंचायत समितीच्या समोरील जागेत अवधूतवाडी पोलिस स्टेशनची नवीन सुसज्ज ईमारत बांधण्यात येत आहे. या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयात कैद्यांसाठी स्वतंत्र वार्ड वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कैदी बांधवांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे. या वार्डचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अधिष्ठाता डॅा.गिरिष जतकर तसेच डॅा.सुरेंद्र भुयार, डॅा.पोटे उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी