जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मध्यस्थी जागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर होते. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश अ. अ. लऊळकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश आर. एस. साळगांवकर व बी. एस. संकपाल, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नहार उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हा मुख्यालयातील सर्व न्यायाधीश, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पिएलव्ही, वकील मंडळी, पक्षकार तसेच न्यायालयील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. व्ही न्हावकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत माहिती दिली. ठराविक प्रकरणात मध्यस्थी प्रक्रिया राबविता येतात. कौटुंबिक वाद, विवाह संबंधातील वाद, शेतीचे वाद असतील तर ते वाद मध्यस्थीने मिटविता येते. वकील लोकांनी मध्यस्थी प्रक्रियेमध्ये व लोकअदालतमध्ये भाग घ्यावा तसेच दोन्ही पक्षकाराच्या संवादाने वाद मिटतो, असे यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सांगितले. या कार्यक्रमात बी. एस. संकपाल यांनी वैकल्पीक वा़द निवारण केंद्र व मध्यस्थी प्रक्रियेमध्ये न्यायाधीश, अधिवक्ता पक्षकार यांची भूमिका या विषयी व दिवाणी प्रसंचे कलम ८९ वर मार्गदर्शन केले. दिवाणी प्रसंचे कलम ८९ वर मार्गदर्शन करताना सांगितले की, न्याय मिळावा म्हणून मध्यस्थी प्रक्रिया अमलात आली आहे. यामध्ये दोन्ही पक्ष सहमत असतील तर वाद हा मिटवला जातो. तसेच दोन्ही पक्षकारांची माहिती ही गोपनीय ठेवण्यात येते. मध्यस्थीकडे प्रकरणे पाठवितांना कोणत्याही टप्यावर असतांना दावा हा मध्यस्थीकडे पाठविला जावू शकतो. तसेच वाद न्यायालयाबाहेर निकाली काढण्याचे व जलद न्याय मिळविण्याच्यादृष्टीने कलम ८९ महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश आर. एस. साळगांवकर यांनी मध्यस्थी कायदा २०२३ या विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सदर कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत. वाद हा सहजासहजी मिटवू शकते. तसेच वकीलांनी पक्षकारांना मध्यस्थीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे असे सांगितले. आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नहार यांनी मानले. संचालन अँड.पी. पी. पोरटकर यांनी केले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी