आयआयएचटी प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश सुरु

केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ईच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. प्रथम वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी तसेच द्वितीय वर्षाकरीता ३ जागा (१ जागा आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता) पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 10 जून पर्यंत मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपुर्ण अर्ज दि. 10 जून पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्रमांक २, ८ वा माळा, बि-विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे उपलब्ध आहे. दुरध्वनी क्रमांक ०७१२-२५३७९२७ यांचे कडून प्राप्त करून घ्यावी. तसेच अर्जाचा नमुना व विहीत पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य नागपूर वस्त्रोद्योगचे आयुक्त अविष्यांत पंडा, प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे यांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी