जिल्हाधिकारी यांची उमरखेड तालुक्यातील विविध कोविड सेंटरला भेटी

 


लसीकरण, पिककर्ज वाटप, खत व बियाणे उपलब्धतेचा घेतला आढावा

यवतमाळ, दि. 17 जून :  जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उमरखेड तालूक्यातील चिल्ली, उमरखेड, विडूळ, ढाणकी, बिटरगाव बु., बोरी वन, थेरडी, कोर्टा, फूलसावंगी तसेच महागाव येथे भेट देवून लसीकरण, पिककर्ज वाटप, खत व बियाणे उपलब्धतेचा काल आढावा घेतला.

उमरखेड तालुक्यातील यवतमाळ व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ यांनी उमरखेड तालूक्यास भेट दिली, भेटी दरम्याण प्रथमत: मौजा चिल्ली येथील लसीकरण केंद्रास भेट देवून लसीकरणाची पाहणी केली. उपरोक्त मान्यवरांनी तहसीलदार उमरखेड यांचे कक्षात कोरोना लसीकरणाची स्थिती, पिककर्ज वाटप तसेच खत व बियाणे यांचे उपलब्धतेबाबत आढावा घेतला.

जिल्हाधिकारी येडगे यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या उमरखेड उपजिल्हा कोवीड रूग्णालयात 100 बेड तर ग्रामीण रुग्णालय, महागाव येथे 80 बेडपर्यंत क्षमता वाढविण्याच्या सुचना केल्या. तसेच बिटरगाव बु. व बोरी वन येथील नागरीकांशी संवाद साधून कोरोना त्रिसुत्रीचे पालन करणे व लसीकरणासंदर्भात जनजागृतीपर माहिती दिली. ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ‘माझे लसीकरण, सर्वांचे संरक्षण :: सर्वांचे लसीकरण, माझे संरक्षण’ ही मोहीम पुर्ण क्षमतेने राबविण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय यंत्रणेला निर्देश दिले.

उपरोक्त दौऱ्यात आ. नामदेव ससाने, जिल्हा आरोग्य अधिकारी फर्लाद चव्हाण, तहसिलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण वानखडे तसेच आरोग्य, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी