जिल्ह्यात आतापर्यंत 70502 कोरोनाबाधीत झाले बरे

 

गेल्या 24 तासात 130 कोरोनामुक्त ; 23 पॉझेटिव्ह

Ø  जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2210 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 16 जून :  गेल्या 24 तासात 130 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70502 झाली आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी  एकूण 1622 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 23 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1599  जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 312 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72600 झाली आहे. तर. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 68 हजार 420 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 95 हजार 743 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.86 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी  दर 1.42  आहे  तर मृत्युदर 2.46 आहे.            

            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2210 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 69 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2210 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 34 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 543 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 27 रुग्णांसाठी उपयोगात तर  499 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 8  उपयोगात तर 1168  बेड शिल्लक आहेत.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी