पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी मदत करण्यास नेहमीच तत्पर - पालकमंत्री संदिपान भुमरे

 










Ø यवतमाळ पोलीस सेवेत 54 जीप व 95 मोटारसायकल दाखल

यवतमाळ, दि. 15 जून :  पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून खरेदी करण्यात आलेली  54 महिंद्रा जीप आणि 95 मोटारसायकली पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते आज हस्तांतरीत करण्यात आल्या. या वाहनाचा उपयोग 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतिमान करून संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी होईल. पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी आपण मदत करण्यास नेहमीच तत्पर राहु असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदीताई पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, प्रामुख्याने उपस्थित होते.

आपत्कालीन मदतीसाठी पोलीस विभागाद्वारे 112 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर अडचणीच्या वेळी संपर्क साधल्यास जीपीएस लोकेशनद्वारे व्यक्तीशी संपर्क साधला जातो. पोलीस दलात समाविष्ट नवीन वाहनामुळे संबंधीत अडचणीतील व्यक्तींजवळ तातडीने पोहचून पोलिसांमार्फत वेळेवर मदत पोहोचविल्या जाईल असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री यांचे हस्ते पोलीस मेस विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन व नूतनीकरण केलेल्या पोलीस ऑफीसर क्लब इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले.

राज्यात जिल्हा नियोजनच्या निधीतून अशाप्रकारे पहिल्यांदाच यवतमाळ पोलीस विभागाला तब्बल आठ कोटी रूपये विकास निधी मंजूर करण्यात आला असूत त्याअंतर्गत पेट्रोलींग वाहनांसाठी 6 कोटी 44 लाख व 2 कोटी 84 लाखाचा निधी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 299 संगणक, 100 प्रिंटर व 77 युपीएस इ. साधनसामुग्री खरेदी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी यावेळी दिली.

000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी