जिल्ह्यात एकूण 593 पॉझेटिव्ह रुग्ण भरती

 


Ø दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु ; 25 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यात बुधवारी नव्याने 25 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली तर  दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालायाच्या आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 593 पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत.

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील सावळा येथील 52 वर्षीय पुरुष आणि नेर येथील 90 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 25 जणांमध्ये 19 पुरुष आणि 6 महिला आहेत. यात आर्णी शहरातील वार्ड नंबर 1 मधील एक पुरूष, तालुक्यातील अमराजपुर येथील एक पुरुष, यवतमाळ तालुक्यातील पिंपरी येथील एक महिला, सुकळी येथील एक महिला, यवतमाळ शहराच्या वैद्य नगरातील एक पुरूष, पुसद शहरातील न्यू पुसद मधील एक पुरूष, मोती नगर येथील दोन पुरूष व एक महिला, पार्वती नगर येथील एक पुरूष, द्वारका नगरी श्रीरामपुर येथील एक पुरूष व दोन महिला, आंबेडकर नगर येथील एक पुरूष, पुसद शहराच्या इतर भागातील तीन पुरूष व एक महिला, दारव्हा शहरातील दोन पुरूष, वणी शहरातील तीन पुरूष, पांढरकवडा शहरातील एक पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष यांचा समावेष आहे.

जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 593 असून होम आयसोलेशनमध्ये 139 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2367 झाली आहे. यापैकी 1573 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 62 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 155 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 101 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 38120 नमुने पाठविले असून यापैकी 37494 प्राप्त तर 626 अप्राप्त आहेत. तसेच 35127 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी