अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत

 


       यवतमाळ, दि. 20 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली आस्थापना, दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

यात सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांची दुकाने, चिकन, मटन, मच्छी आणि अंड्यांची दुकाने, कृषी संबंधित दुकाने, बियाणे, खते आणि शेती अवजारे व त्याची दुरुस्ती इ. सेवा, पशुखाद्याची दुकाने, मान्सुन पूर्व कामकाज करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने दिनांक 21 एप्रिल 1 मे 2021 पर्यंत सकाळी 7 ते सकाळी 11  वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व प्रकारची हॉटेल व उपहारगृह यामधून पुरविण्यात येणारी होम डिलेव्हरी सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहतील. (कोणालाही हॉटेल व उपहारगृहामध्ये ऑर्डर देण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची मुभा राहणार नाही.)

तसेच सर्व प्रकारची रुग्णालये, डायग्नोस्टीक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्याचे वितरण, वाहतूक व्यवस्था, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे व तत्सम बाबी, कच्चा माल युनिट आणि त्यासंबंधीत सेवा इत्यादी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्याची औषधांची दुकाने, पेट्रोलपंप व पेट्रोलियम पदार्थ संबंधीत उत्पादने, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम, टपाल सेवा या कार्यालयाचे आदेश दिनांक 14 एप्रिल 2021 मध्ये नमूद केल्यानुसार सुरु राहतील. तसेच शासकीय कार्यालये, परवानगी असणारे खाजगी कार्यालये, बँका ह्या त्यांचे कार्यालयीन वेळेनुसार सुरु राहतील.

सदर आदेश यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

००००००

 

 

 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी