फिरत्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनद्वारे व लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

 





Ø अमरावती येथील  क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचा उपक्रम

Ø  जिल्हाधिका-यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

यवतमाळ दि. 12 : अमरावती क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो मार्फत  कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यात बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. या अनुषंगाने फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, अमरावतीचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, लसीकरणाबाबत पारंपारिक कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचसुत्रीच्या नियमांचे पालन करावे. यात नियमित मास्क वापरणे, सामाजिक अंतर, वारंवार हात स्वच्छ धुणे, लक्षणे असल्यास त्वरीत चाचणी आणि पात्र नागरिकाचे लसीकरण यांचा समावेश आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात 15 व्हॅनव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड लसीकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, अमरावतीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, दारव्हा, आर्णि, दिग्रस, महागाव, उमरखेड, पुसद आदी तालुक्यातील दररोज 10 गावांमध्ये 20 दिवस व्हॅनव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे. 

या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.

यावेळी नवचैतन्य बहुदेशीय विकास मंडल आणि श्रीकृष्ण बहुदेशीय विकास मंडल, यवतमाळ कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाचे आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी