पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस गस्ती वाहनांचे हस्तांतरण

 





Ø महाराष्ट्र इमरजंन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल 112’ उपक्रम

Ø पोलिस विभागासाठी नव्याने 54 जीप आणि 95 दुचाकी प्राप्त   

यवतमाळ, दि. 13 : आपात्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरीत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र इमरजंन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल 112’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात पोलिस गस्तीकरीता 54 जीप व 95 दुचाकी नव्याने प्राप्त झाल्या असून पोलिस विभागाला त्याचे हस्तांतरण राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलिस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. भुमरे यांनी नवीन जीपचे विधीवत पूजन व हिरवी झेंडी दाखवून सदर जीप पोलिस विभागाकडे हस्तांतरीत केल्या. तत्पूर्वी प्रास्ताविकात जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणाले, यापूर्वी पोलिसांच्या मदतीसाठी, अग्निशमन सेवेसाठी तसेच रुग्णवाहिकेसाठी विशिष्ठ क्रमांक आहे. त्याच धर्तीवर आता आपात्कालीन मदतीसाठी ‘डायल 112’ हा क्रमांक उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर कोणत्याही नागरिकाने मदतीसाठी कॉल केला तर कोणत्या जिल्ह्यातून फोन आला, याची माहिती राज्याच्या नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यानुसार सदर संदेश संबंधित जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्यावर फोन करणा-या नागरिकाला तात्काळ मदत उपलब्ध करून येईल.

जिल्ह्याला नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत 54 जीम व 95 दुचाकी साठी 6 कोटी 44 लक्ष रुपये जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे. सदर वाहने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, सर्व पोलिस ठाणे आदी ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन अशोक कोठारी यांनी केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. खांडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार प्रदीप परदेशी, अवधुतवाडी ठाण्याचे ठाणेदार श्री. केदारे, राखीव पोलिस निरीक्षक अरविंद दुबे आदी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी