वनविभागाचा चित्ररथ वेधतोय लक्ष
*यवतमाळ वनपरिक्षेत्रात वृक्षरोपनाचा जागर
यवतमाळ, दि. 24 : यवतमाळ वन परिक्षेत्राअंतर्गत येत्या 1 जुलै रोजी होवू घातलेल्या वृक्षारोपण मोहिमेची जनजागृती करण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. तसेच ॲटोरिक्षावर लावलेले बॅनर्स आणि चित्ररथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या चित्ररथाची संकल्पना नागरिकांना चांगलीच भावली आहे.
यवतमाळ वन परिक्षेत्रात 50 हजार झाडे लावण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आसोला, आलेगाव आणि करळगाव रोप वनक्षेत्रातील गावात वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती सभा घेण्यात आल्या. या सभामध्ये कोब्रा ॲडव्हेंचर क्लबचे श्याम जोशी यांनी नागरीकांना वृक्ष लागवडीचे महत्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाना क्षेत्र सहाय्यक डी. ए. खटुले, श्री. गाडगे, गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मोहिमेत सहभागी होवून श्रमदान करण्याचे आश्वासन यावेळी नागरीकांनी दिले. इचोरी भेायर, चिचबर्डी, किटा-कापरा, जांब, लासिना, पिंपरी, तिवसा आदी गावातही जनजागृती सभा घेण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी